अंढेरा (नंदकिशोर देशमुख – बुलडाणा कव्हरेज न्युज): दारूच्या व्यसनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंढेरा गावात घडली. प्रमोद प्रकाश हिवाळे (वय 38, रा. काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) या तरुणाचा मृतदेह 6 जून 2025 रोजी अंढेरा गावाच्या पश्चिमेस सुमारे 100 मीटर अंतरावर आढळून आला.
प्रमोद हिवाळे याला दारू पिण्याचे तीव्र व्यसन होते आणि तो नेहमी नशेच्या अवस्थेत राहत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून, याची नोंद दुपारी 2.58 वाजता करण्यात आली.
या प्रकरणी प्रमोदचा भाऊ अनिल हिवाळे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक रामेश्वर आंधळे (बंदोबस्त क्र. 282) यांच्या फिर्यादीवरून मरगांव क्र. 18/2025 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 194 (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अंढेरा ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन वाघ करीत आहेत.
या घटनेमुळे अंढेरा व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दारूच्या व्यसनाचे गंभीर परिणाम समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. व्यसनमुक्तीची आवश्यकता आणि जनजागृतीची गरज यावर नव्याने विचार करण्याची वेळ आल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.