छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर परिसरातील पाटील लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई ५ जून रोजी रात्री १०.४५ वाजता सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.छाप्यादरम्यान लॉज व्यवस्थापक गणेश भीमराव भारती याला अटक करण्यात आली असून, पाच ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये पश्चिम बंगालमधून आणलेल्या तरुणींना पिळवणूक करून देहव्यापारासाठी लावले जात होते.
अशी झाली कारवाई…
सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांनी पोलीस पथकासह गोपनीय माहितीच्या आधारे छाप्याचे नियोजन केले. एक बनावट ग्राहक तयार करून त्याला पाटील लॉजवर पाठवण्यात आले. ग्राहकाने सिग्नल दिल्यानंतर पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. त्यावेळी एका तरुणीसोबत एक ग्राहक रूममध्ये आढळला.दुसरी तरुणी लॉजच्या बेसमेंटमधून पळण्याचा प्रयत्न करत होती, पण महिला पोलिसांनी वेळीच तिला पकडले. दोन्ही तरुणी पश्चिम बंगालमधील असून, त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात होता.
पाच ग्राहक ताब्यात!
लॉजच्या काउंटरमागे बसलेल्या पाच तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे पाचही जण वेश्याव्यवसायासाठी लॉजवर आले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे —
मनोहर नाईक (१९, मोहाडी, ता. पाचोरा, जळगाव)शाहीराम सोळुंके (२८, चिमणापूर, ता. कन्नड)कुंदन जाधव (२४, करोडी, ता. संभाजीनगर)सुनिल टकले (२८, रोहिलागड पाचोड, ता. अंबड, जि. जालना)साईनाथ अर्जुने (१९, कोरेवाडी, ता. देवणी, जि. लातूर)
पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे!
छाप्यात लॉजमधून दीड हजार रुपये रोख, २२ बॉक्स कंडोम, एक रजिस्टर जप्त करण्यात आले. त्या रजिस्टरमध्ये ग्राहकांची नावे, वेळा, व देण्यात आलेल्या रक्कमेची नोंद होती. या प्रकरणात लॉज मालक गरुडा पाटील (रा. रांजणगाव, ता. गंगापूर) याचाही सहभाग समोर आला आहे.
गुन्हा दाखल!
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात लॉज मालक, मॅनेजर व पाच ग्राहकांविरोधात अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.