कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी सिंदखेडराजात मंगळवारी ‘शेतकऱ्यांचा एल्गार’; शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जोरदार तोफ धडाडणार….

सिंदखेड राजा (सुरेश हुसे:- बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. २७ मे २०२५ रोजी सिंदखेडराजा येथील सावता भवनात सकाळी ११ वाजता ‘शेतकऱ्यांचा एल्गार’ मेळावा होणार असून, शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.कर्जमुक्ती आणि अद्याप न मिळालेला पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, या दोन मुख्य मागण्यांसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले जाणार आहेत. मातृतीर्थ असलेल्या सिंदखेडराजा नगरीत होणाऱ्या या मेळाव्याला शेतकरी आणि शेतमजूर बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.—

प्रमुख मागण्या :

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तातडीने द्यावी.२०२३-२४ चा रखडलेला पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई तात्काळ मिळावी.सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी.शेती पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कंपाउंडची व्यवस्था करावी.सोयाबीन व कापूस पिकांसाठी प्रति क्विंटल ३,००० रुपयांचा भावफरक देण्यात यावा.

शेतमजुरांना विमा कवच लागू करावे.—

रविकांत तुपकर राज्यभर दौरे करत शेतकऱ्यांना संघटित करून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या सभांना व मेळाव्यांना राज्यभरातून शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “कर्जमुक्ती आणि पीकविमा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली असून, त्याच अनुषंगाने सिंदखेडराजा येथेही हा एल्गार उभा राहणार आहे.—

मेळाव्याची माहिती :ठिकाण : सावता भवन, सिंदखेडराजा (जि. बुलढाणा)दिनांक : २७ मे २०२५ (मंगळवार)वेळ : सकाळी ११ वाजता

आयोजक : क्रांतिकारी शेतकरी संघटना—संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, हक्काच्या पीकविम्यासाठी आणि शेती व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हा एल्गार म्हणजे लढ्याचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही त्यांनी आपली ‘पावती’ सोबत आणून मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

“हक्कासाठी एल्गार – आता निर्णय हवा!”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!