तीन मुलांनी तिला “चित्रपट पाहण्यासाठी जाऊया, अस खोट बोलून तिला रूम वर नेले अन् तिघांनी तिच्यावर अळीपाळी ने…….

धक्कादायक! चुलत काकाने अल्पवयीन पुतणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवले; धाड पोलिसांची त्वरित कारवाई

सांगली (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) सांगली शहरातील वानलेसवाडी परिसरात मंगळवारी (२० मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली. एमबीबीएसच्या शिक्षण घेत असलेल्या तरुणीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.सदर पीडिता सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, मूळची बेळगावची आहे. तिच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिसांनी विनय विश्वेश पाटील (२२, सोलापूर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (२०, पुणे) आणि तन्मय सुकुमार पेडणेकर (२१, सांगली) या तिघांना अटक केली आहे. विनय आणि सर्वज्ञ हे दोघे तिच्याच कॉलेजमध्ये शिकतात, तर तन्मय हा त्यांचा मित्र आहे.

मंगळवारी रात्री तिघांनी तिला “चित्रपट पाहण्यासाठी जाऊया” असे सांगून वानलेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर नेले. तेथे त्यांनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला प्यायला दिले. औषधाचा प्रभाव आला असताना तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यावर तिने धाडस करून तेथून पळ काढला आणि थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत तिघाही आरोपींना अटक केली.विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!