चिखली – मेहकर महामार्ग वर ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळले; ट्रॅक्टर चालकांनी केली स्वतःसोबत चलाकी!

मेहकर ( बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्ह्यात मागील चार–पाच दिवसांपासून वादळी पावसाचा जोर सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच चिखली–मेहकर मार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रॅक्टर थेट नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. या चिखलावरून ट्रॅक्टर घसरले आणि थेट नदीत कोसळले. मात्र, सुदैवाने ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखून वेळेत उडी घेतली आणि मोठा अपघात टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना समोर आल्यानंतर रस्त्यावरील साचलेला चिखल आणि अपुऱ्या देखरेखीमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!