खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) खामगाव तालुक्यातील एका गावात १७ मे रोजी दुपारी १२ वाजता घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात, २८ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिची छेडछाड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी आकाश राऊत हा घरात जबरदस्तीने घुसला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिची सासू, जेठ आणि इतर नातेवाईकांनी धाव घेऊन तिला वाचवले.त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करत आणि धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
तिला घरात एकट पाहिलं,मग हा भामट्यां तिच्या घरात घुसून तिच्या सोबत…..; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!
