“तुम्हाला कापून टाकू” पेनटाकळी येथील सरपंच व ग्रामसेवकाला जीवे मारण्याच्या धमक्या! भानगड काय आहे वाचा सविस्तर…

चिखलीत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना; बाप-लेक गंभीर जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मेहकर (अनिल मंजुळकर:- बुलडाणा कव्हरेज न्युज) पेनटाकळी ग्रामपंचायतीत भूखंडांच्या ताबे पावत्यांचे वाटप सुरू असताना काही नागरिकांनी ग्रामसेवक आणि सरपंचाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात सोमवारी (१९ मे) सायंकाळी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*

*घटनेचा तपशील….*

ग्रामपंचायत अधिकारी गजानन पंजाबराव मवाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पेनटाकळी गावातील पुनरस्थापित जागांचे स्थलांतर व अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया १७ मे रोजी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक मवाळ, सरपंच परमेश्वर वानखेडे आणि कोतवाल सारिका राऊत हे मिळून लाभार्थ्यांना ताबे पावत्यांचे वितरण करत होते.या दरम्यान काही नागरिक उपस्थित होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसामुळे काही नागरिकांच्या घरावर दगड पडले.

त्यानंतर अश्विनी परमेश्वर वानखेडे, सत्यभामा तेजराव वानखेडे, सुनीता सुरेश गवई आणि परमेश्वर सुदाम वानखेडे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी पावसामुळे घराचे नुकसान झाल्याचे सांगत संताप व्यक्त केला.त्यानंतर त्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, “तुम्हाला कापून टाकू” अशी धमकी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला, अशी तक्रार करण्यात आली.

पोलीस कारवाई!

सदर प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी वरील चौघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!