Advertisement Advertisement

महिलांच्या सुरक्षेच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं!; “आम्ही जिजाऊच्या लेकी हाय… स्वाभिमानाशी खेळ केला तर गाठ आमच्याशी!”; श्वेता महालेंच्या कथित वक्तव्यावर महिला आघाडी पेटली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार, ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबंधित वक्तव्याची निष्पक्ष चौकशी करून, त्यात आक्षेपार्ह आशय आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करावी, तसेच आमदार श्वेता महाले यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, सर्वसामान्य महिला कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा, प्रतिष्ठेचा किंवा चारित्र्याचा संदर्भ देऊन त्यांची बदनामी करणे योग्य नाही. आमदार महाले यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा मूळ व्हिडिओ, ऑडिओ तसेच त्यामागील संपूर्ण संदर्भ प्रशासनाने तपासावा. तपासणीत आक्षेपार्ह आशय आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला आघाडीने केली.

यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही जिजाऊंच्या लेकी असून स्वाभिमानाशी तडजोड खपवून घेणार नाही,” अशी भूमिका घेतली. शिवसेनेमध्ये महिला कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते, असा दावाही त्यांनी केला. आमदार संजय गायकवाड हे महिला कार्यकर्त्यांचा लेकी आणि बहिणीप्रमाणे सन्मान करतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

विकासकामे किंवा राजकीय धोरणांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र, महिलांच्या सन्मानाचा विषय असताना एका महिला लोकप्रतिनिधीने केलेले कथित वक्तव्य योग्य नसल्याचे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आमदार श्वेता महाले यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माफी मागितली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!