23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मासरुळ येथील घटना…

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

मासरुळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धाड पोलीस स्टेशन हद्दीतील मासरुळ गावातील अजय उर्फ दीपक विजय पवार (वय 23) या तरुणाने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, बीट जमादार सुनील सोनुने आणि पोलीस कॉन्स्टेबल सतिष जाधव घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह धाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

जाहिरात…

मृतकाचे आई-वडील मजुरीसाठी बारामती येथे असल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी पार पडली. या घटनेचा तपास धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

अजय पवार याच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ व बहिण असा आप्तपरिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!