घाटपुरीत १६ वर्षीय मुलाची आत्महत्या, गावात खळबळ!

पळसखेड चक्का येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)
शहराला लागून असलेल्या घाटपुरी येथील इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या गणेश विनोद उचाडे (वय १६) या अल्पवयीन मुलाने ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता जनावरांच्या गोठ्यात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गणेशने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी ज्ञानेश्वर उचाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!