ZP Election Municipal Elections: जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा मेगा रोडमॅप जाहीर होणार! आयोगाचा मोठा निर्णय; कोणत्या १२ जिल्हा परिषदांसोबत २९ महापालिकांच्या निवडणुका होणार?

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – राज्यात नगर परिषद व नगर पालिका निवडणुका पार पडताच आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठीची मतदार यादी जाहीर करण्याची मुदत आणखी ५ दिवसांनी वाढवून महत्त्वाची पायरी टाकली आहे.

राज्यातील २९ महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळ अधिवेशन फक्त एक आठवडा चालणार असल्यामुळे अधिवेशनानंतर महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे.

आरक्षणाचा मुद्दा आणि निवडणूक प्रक्रियेत बदल….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाने तीन टप्प्यांत मतदानाची रूपरेषा आखली होती.
▪ पहिला टप्पा – नगर परिषद व नगर पालिका
▪ दुसरा टप्पा – ३२ जिल्हा परिषद व पंचायत समित्या
▪ तिसरा टप्पा – २९ महापालिका

मात्र, ओबीसी आरक्षण २७ टक्के राखून ठेवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेऊन हा मुद्दा सरळ सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये, असा आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व नियोजन पुन्हा तपासण्यास सुरुवात केली.

२९ महापालिका व १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्राथमिक चाचपणी…..

निवडणूक आयोगाने आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणूक साधने आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोशल मीडियावर दिली.

५०% आरक्षण न ओलांडलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका….

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्या या ५० टक्के आरक्षण मर्यादेत येतात. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात निवडणुका होण्याचे संकेत आयोगाने दिले आहेत.

तर दुसरीकडे, दोन महापालिकांनी ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने त्यांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!