शेगांव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १७ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आदीत्य श्रीकृष्ण श्रावणे (वय १७, रा. भोईपुरा, शेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदीत्य श्रावणे हा १३ जुलै रोजी भारत गॅससाठी केवायसी करण्याकरिता दुचाकीने जात होता. दरम्यान, बाळापूर रोडवरील आनंद विहार समोरील कब्रस्तानजवळ त्याची दुचाकी अचानक घसरली आणि तो रस्त्यावर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने शेगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २७ जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास नापोकॉ निलेश गाडगे करीत आहेत….
2 thoughts on “दुचाकी घसरून अपघात; १७ वर्षीय युवकाचा मृत्यू…”