देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या कामासाठी काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करा.आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता कामाला सुरुवात केली.देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करणे आणि इसरुळ ते वायगाव रस्ता डांबरीकरण करण्याचे बंद पडलेले काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा २४ नोव्हेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्यासह इसरूळचे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला.देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ मार्गावर पडले होते खड्डे…!१९ नोव्हेंबरपासून रस्ताकामाला सुरुवात झाली. या कामाची डॉ. मिसाळ यांनी पाहणी करून कंत्राटदाराला सूचना केल्या. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी डॉ. विकास मिसाळ हे वारंवार आक्रमक भूमिका घेत अभान, त्यांच्या आंदोलनामुळेच या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. मागील काही महिन्यांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले होते.देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाच्या कामाचा कार्यारंभआदेश देऊन अनेक महिने झाले. काम करण्याची मुदतसुद्धा संपली होती. अद्यापपर्यंत डांबरीकरण तर सोडाच, परंतु रूंदीकरणाचेसुद्धा काम पूर्ण करण्यात आलेले नव्हते. म्हणजेच एकूण कामाच्या १० टक्के कामसुद्धा करण्यात आले नाही. हारस्ता अतिशय खराब झाल्याने वाहनधारकांना तसेच रस्त्यालगतचे शेतकरी आणि रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच इसरूळ ते वायगाव रस्ता डांबरीकरणाच्या कामासंदर्भात १७फेब्रुवारी रोजी डॉ. विकास मिसाळ यांच्यासह सतीश पाटील, बाळू पाटील या सरपंचांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिगणे यांच्या उपस्थितीत देऊळगावराजा उपविभागीय अभियंत्यांनी २५ फेब्रुवारी २०२५ पासून काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. अखेर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास मिसाळ आणि सरपंच सतीश भुतेकर यांनी देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ बंद पडलेल्या कामासाठी इशारा देताच पीडब्ल्यूडीने सुरू केले रस्त्याचे काम..!













