नदीच्या उंच कड्यावरुन उडी घेतली आणि, एक चूक जीवावर बेतली; वारी हनुमान धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

नदीच्या उंच कड्यावरुन उडी घेतली आणि, एक चूक जीवावर बेतली; वारी हनुमान धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ असलेल्या वारी हनुमान धरणावर एका तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांचा उत्साह वाढतो, पण अतिउत्साहात केलेली एक चूक जीवावर बेतू शकते, याची प्रचिती या घटनेने दिली. शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दु:खद घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शस्त्राचा धाक दाखवून गर्भवती महिलेला जंगलात नेऊन नको ते तिच्या सोबत केलं…दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील रहिवासी असलेला २३ वर्षीय अक्षय सिद्धार्थ भोजने हा आपल्या तीन मित्रांसह वारी हनुमान येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी आला होता. त्याच्या मित्रांमध्ये प्रेम महेंद्र डोंगरे, रवींद्र गजानन पोहनकर आणि राहुल रवींद्र विरघट यांचा समावेश होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास हे सर्वजण वारी हनुमान धरणावर पोहोचले. दर्शनानंतर दुपारी दोन वाजता अक्षयने अरनदीच्या रांजण्या डोहात पोहण्यासाठी नदीच्या उंच कड्यावरून उडी घेतली. मात्र, बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही.

अक्षय बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांना आणि स्थानिक नागरिकांना काळजी वाटू लागली. त्यांनी तात्काळ नदीत त्याचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अक्षय मृतावस्थेत नदीत आढळला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. अक्षयचा भाऊ अनमोल सिद्धार्थ भोजने (वय ३३) याने सोनाळा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. सोनाळा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वारी हनुमान धरण हे धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यामुळे भाविक आणि पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. सध्या पावसाळ्यामुळे नद्या, धरणं आणि डोह ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अक्षयच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने पावसाळी सहलीदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!