BIG BREAKING : सिंदखेड राजा तहसीलमध्ये ७ हजारांची लाच घेताना दोन महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

BIG BREAKING : सिंदखेड राजा तहसील कार्यालय मध्ये एक तलाठी आणि महसूल सहाय्यक ACB च्या जाळ्यात!

सिंदखेड राजा (रफिक शेख- बुलडाणा कव्हरेज न्युज): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुलढाणा येथे सिंदखेडराजा तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत दोन महसूल कर्मचाऱ्यांना ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणातील आरोपी रावसाहेब बाबुराव काकडे (वय ५०, तलाठी, सिंदखेडराजा) आणि मनोज काशीराम झीणे (वय ४५, महसूल सहायक, तहसील कार्यालय सिंदखेडराजा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीच्या शेतजमिनीच्या नावनोंदणीच्या कामासाठी तलाठी रावसाहेब काकडे यांनी २० जून २०२५ रोजी ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, एसीबीने २४ जून २०२५ रोजी पोलिस निरीक्षक भागोजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात सापळा रचला. या कारवाईदरम्यान, आरोपींनी तक्रारदाराकडून ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. सापळा पथकात पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलिस निरीक्षक रमेश पवार, सहायक पोलिस निरीक्षक शाम भांगे, पोलिस हवालदार प्रवीण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, जगदीश पवार, विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, नितीन शेटे आणि शेख अरशद यांचा समावेश होता. या पथकाने तत्परतेने आणि नियोजनबद्ध रीतीने कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. ही कारवाई शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाचखोरीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या या कठोर पावलामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईचा संदेश सर्वत्र पोहोचला आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “BIG BREAKING : सिंदखेड राजा तहसीलमध्ये ७ हजारांची लाच घेताना दोन महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!