पिंपळगाव सराई रोडवर 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या: युवकांच्या आत्महत्येचा वाढता आकडा चिंताजनक

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यात युवकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, ही परिस्थिती आता चिंतेचा विषय बनली आहे. आज, पिंपळगाव सराई-चिखली रोडवरील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन १९ वर्षीय युवकाने आपले जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये शोक आणि संतापाची लाट पसरली आहे.

मृत युवकाचे नाव राजिक खा इस्माईल खा असे आहे. तो चिखलीतील सैलानी नगर येथील रहिवासी होता. आज दुपारी अंदाजे ३ वाजण्याच्या सुमारास त्याने कमरेच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! चुलत काकाने अल्पवयीन पुतणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवले; धाड पोलिसांची त्वरित कारवाई

राजिकने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये या घटनेच्या कारणांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. शिक्षणातील अपयश, बेरोजगारी आणि कौटुंबिक तसेच मानसिक तणाव यांसारखी कारणे युवकांना टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. चिखली तालुक्यात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने समाजातील ही गंभीर समस्या अधोरेखित झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. “प्रत्येक आत्महत्या ही समाजाला आणि प्रशासनाला एक इशारा आहे. पण सरकार आणि प्रशासन केवळ आकडेवारी गोळा करण्यात मग्न आहे. युवकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” अशी खंत एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली. अनेकांनी बेरोजगारी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून समुपदेशन केंद्रे आणि रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्याची मागणी केली आहे.

चिखली तालुक्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, येथील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती या समस्येला खतपाणी घालत असल्याचे दिसते. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा समाजातील युवकांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांना आधार देण्याच्या व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!