चिखली (ऋषी भोपळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची नेहमीच काट्याची टक्कर पाह्यला मिळते प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्ष सातत्याने आपली ताकद दाखवत आले आहेत. मात्र, प्रत्येकवेळी राष्ट्रवादी वरचढ ठरत गेली मात्र २०१४ मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली होती या पाचवर्षाचा अपवाद वगळता सिदंखेडराजा मतदार संघ हा १९९५ पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे तो आता पर्यत!
असे असले तरी मेराखुर्द जिल्हापरिषद सर्कल मात्र राष्ट्रवादी साठी नेहमीच कमजोर राहिले. २०१३ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे पांडुरंग मामा खेडेकर यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर जिल्हापरिषद निवडणूक जिकंली होती. मात्र त्या नंतरही या सर्कलमध्ये राष्ट्रवादी ची मुळ पाहिजे तसी रुजली नाही त्याला कारण बहुतेक चिखली मतदारसंघातील राजकारणाचा या सर्कलवर असलेला पगडा असावा.
या सर्कलमधील काही गावामध्ये वैयक्तिक माजी आमदार डॉ शिंगणे यांना मानणारा मतदार वर्ग आहे.डॉ राजेंद्र शिंगणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पवार गटात प्रवेश घेतला. डॉ शिंगणे यांचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठोपाठ पवार गटात गेले त्या मुळे या सर्कलमध्ये अजितदादा गट कमजोर पडला आहे.
जिल्हापरिषद निवडणुकीची चाहूल लागताच घड्याळाची टिकटिक वाजायला सुरुवात झाली खरी परंतु या भागात पक्ष उभा करण्यासाठी आद्यपतरी खंबीर नेतृत्व समोर आलेलं नाही. युवा नेते मनोज कायदे हे आमदार झाल्या पासून आता तुतारीचा आवाज बाकी सर्कलमध्ये मागे पडल्यासारखा भासत आहे. त्यामुळे मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीचा मागोवा घेतल्यास, सिंदखेडराजा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या हाती असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला (तुतारी)यश मिळवता आले नाही. डॉ. शिंगणे यांच्यासमोर विशेष असे कोणतेही आव्हान नव्हते. याउलट, त्यांच्या विरोधात महायुतीकडून दोन उमेदवार- सध्याचे आमदार मनोज कायदे आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर- रिंगणात होते. मात्र, मतविभाजनामुळे शेवटी डॉ. शिंगणे यांना पराभवाची माळ गळ्यात घातली.
यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी एकत्र येणार की पुन्हा एकदा वेगळे लढणार, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. राजकारणात “काहीही होऊ शकते” या उक्तीप्रमाणे दोन्ही गट आपल्या रणनीती जुळवत आहेत.
मेरा खुर्द सर्कलमध्ये राष्ट्रवादीची ‘कमकुवत’ स्थिती!
मेरा खुर्द सर्कलमधील परिस्थिती पाहिल्यास, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर तसा ठोस उमेदवार नाही. त्यामुळे त्यांना बाहेरून कोणाला तरी “आयात” करावे लागणार का, की स्थानिक नेतृत्व घडवले जाईल, यावर साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या सर्कलमध्ये शेतकरी संघटना,कॉग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी पवार गट यांचे प्राबल्य आहे सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास चौरंगी लढत पाह्यला मिळेल. कारण इतर छोटे पक्ष सध्या तरी फारसे मैदानात ताकदीने उतरलेले दिसत नाहीत.
राजकीय दृश्य सध्या बदलत चालले असून, स्थानिक निवडणुकीचा रंग आता चढायला सुरुवात झाली आहे. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यातील झोप उडाली असून, मतदारसंघात राजकीय घडामोडी दिवसेंदिवस रंगत जात आहेत. येणाऱ्या काळात कोण कोणाच्या सोबत राहील आणि कोण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “मेरा खुर्द सर्कलमध्ये ‘घड्याळा’ची टिकटिक मंदावली! ऐन वेळेवर विधानसभा सारखा उमेदवार देणार? की युतीला पाठींबा देणार?”