अमरावती, (बुलडाणा कव्हरेज न्युज): अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सुमारे सहा वर्षांपासून प्रेमाच्या नावाखाली जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुषार अशोक गाढवे (वय २८, रा. मोर्शी, जि. अमरावती) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणीने आपल्या आईसोबत शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पीडित मुलगी १४ वर्षांची असताना तिची तुषार गाढवेसोबत ओळख झाली. तुषारने तिचा विश्वास संपादन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. १४ एप्रिल २०१९ पासून मे २०२५ पर्यंतच्या कालावधीत त्याने तिच्या संमतीशिवाय अनेकदा तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. मुलीने याला विरोध केला असता, तुषारने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या धमक्यांमुळे घाबरलेली मुलगी गप्प राहिली; पण सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडित मुलीने आपल्या आईसोबत शिरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीत तिने सांगितले की, तुषारने लहानपणापासूनच तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला. प्रेमाच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतला आणि नकार दिल्यावरही धमक्या देऊन जबरदस्ती केली. शिरखेड पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि संशयित तुषार गाढवेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सखोल तपास करत असून, संशयिताला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.