शेतात वाद; महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा…

तू दगड लावू नको, इथून निघून जा,आता लगेच याला जीवाने सोडत नाही! असे म्हणत म्हणत डोक्यात लोखंडी रॉड ने जोरदार.....

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – पिंप्राळा शिवारात शेतात ट्रॅक्टर आणल्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून महिलेशी अशोभनीय वर्तन करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. संबंधित विवाहित महिला आपल्या पतीसोबत शेतात काम करत असताना गावातील गोपाळ नगर येथील राजाराम रामचंद्र खडसे हा ट्रॅक्टर घेऊन त्यांच्या गट क्रमांक १८९ मधील शेतात आला.महिलेने त्याला ट्रॅक्टर का आणला, असे विचारले असता आरोपीने चिडून तिच्यावर धाव घेतली, तिचा हात पकडला आणि अश्लील हेतूने तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे.

या प्रकरणी महिलेने खामगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, १३१, ३५२, ३५१ (२) (३) नुसार राजाराम खडसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!