खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शहरातील सरस्वती नगरातील संत गजानन महाराज मंदिरात ११ जुलैच्या रात्री चोरीचा संतापजनक प्रकार घडला. अज्ञात चोरट्याने देवस्थानातील चांदीचं छत्र, दानपेटीतील रोख रक्कम आणि CCTV चा DVR चोरून नेला. एकूण चोरी गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ३८ हजार रुपये असल्याचं समोर आलं आहे.काय चोरलं गेलं?पुजारी आणि मंदिराचे उपाध्यक्ष कचडूलाल छगनलाल पुरोहित (वय ६३) यांनी
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,
सुमारे ३० हजार रुपये किमतीचं चांदीचं छत्र,दोन दानपेट्यांतील अंदाजे ६ हजार रुपये,आणि २ हजार रुपये किमतीचा CCTV DVR असा एकूण ३८ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
पोलिसांची कारवाई सुरू
ही घटना लक्षात येताच १२ जुलै रोजी सकाळी ११:१३ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार देवेंद्र शेळके पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ३८० (अ) आणि ४५४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
जनतेत संतापाचे वातावरण
देवस्थानावर हात घालणाऱ्या चोरट्याविरोधात जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून, “देवाच्या मंदिरात चोरी करणारा हा समाजकंटक तात्काळ पकडला जावा,” अशी जोरदार मागणी होत आहे. “महाराजांचा न्याय चुकणार नाही, चोरट्याला शिक्षा निश्चित मिळेल,” अशी भावनाही भाविकांमधून व्यक्त होत आहे.
1 thought on “भामट्यांनी देवाला तर सोडायचं असत; संत गजानन महाराज मंदिरात चोरी !”