मेहकर( बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर तालुक्यातील उसरण जवळील ब्रह्मपुरी परिसरात एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. ऊसतोड कामगार पुरवठ्यासाठी दिलेल्या आगाऊ रकमेतून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
हिवरा आश्रमाजवळील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आत्माराम कुसाळकर हे दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना इनोव्हा गाडीत बसवून पळवून नेल्याचे नातेवाइकांनी सांगितले.













