बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राज्यभरात जोरदार वाऱ्यासह पावसाने थैमान घातलं असताना, एक दुर्घटना टळली आणि एका कुटुंबाचा जीव वाचला, तोही राष्ट्रवादी काँग्रेस चिखली तालुका युवक अध्यक्ष (अजित पवार गट)रुपेश रिंढे यांच्या सतर्कतेमुळे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे येथे झालेला वर्धापन दिन मेळावा आटपून रुपेश रिंढे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गावी परतत होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर त्यांना एक स्कुटीवरून जात असलेलं कुटुंब एका लिंबाच्या झाडाखाली अडकलेलं दिसलं. जोरदार वाऱ्यामुळे झाड अचानक कोसळलं होतं आणि संपूर्ण कुटुंब त्याखाली दबले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रिंढे यांनी एक क्षणही न दवडता तात्काळ स्वतःच्या गाडीने थांबून मदतीसाठी धाव घेतली. मंगेश लोखंडे, ऋषी हावरे आणि श्याम चित्राले या सहकाऱ्यांसह त्यांनी पावसात झाड हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलं.
यानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या या धाडसी आणि माणुसकीच्या कृत्याचं परिसरात कौतुक होत आहे.
तुफान वाऱ्यात माणुसकीचं उदाहरण ठरलेले हे कृत्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
1 thought on “तुफान पावसात लिंबाचं झाड कोसळलं; रुपेश रिंढे यांनी वाचवले कुटुंब !”