चिखली (गणेश पाटील: बुलडाणा कव्हरेज न्यूज): ७ मे, चिखली तालुक्यात आज दुपारी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
चिखली-बुलडाणा मुख्य रस्त्यावरील मालगणी फाट्याच्या अलीकडे एक मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळले. या झाडामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागली असून, रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प आहे. घटनास्थळी अद्याप सरकारी यंत्रणा पोहोचलेली नाही. मात्र, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी तत्काळ माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली.
त्यांनी झाड हटवून रस्ता मोकळा करण्याची यंत्रणा जात आहे अशी सांगितले आहेसध्या नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून तत्काळ कारवाई होण्याची अपेक्षा आहे.