मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात एका गर्भवती विवाहितेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. दोन नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना १० जुलै २०२५ रोजी रात्री घडली. पीडित महिला ही २१ वर्षीय गर्भवती असून, ती आपल्या पती, सासू आणि लहान मुलासह शेतात राहते. रात्री साडेअकराच्या सुमारास मोहन बरेला आणि त्याच्या एका साथीदाराने पीडितेच्या घरात घुसून तिच्या पती आणि सासूवर लोखंडी विळा आणि विटांचा वापर करून क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेचे पती आणि सासू गंभीर जखमी झाले.
हल्लेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत गर्भवती महिलेचे अपहरण केले आणि तिला मलकापूर तालुक्यातील बेलाड फाटा परिसरातील बहापुरा शिवारात नेले. तिथे दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. या भीषण प्रसंगानंतर पीडितेने कसाबसा घरी परत येत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपास युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मलकापूर परिसरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.













1 thought on “शस्त्राचा धाक दाखवून गर्भवती महिलेला जंगलात नेऊन नको ते तिच्या सोबत केलं…दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल”