POLITICAL NEWS : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक गट व दोन गण वाढणार…! दोन जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार…!

जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?

बुलडाणा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेस सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारं पुन्हा एकदा वाहू लागले आहे. १२ जूनपासून ही प्रक्रिया सुरु झाली असून, यंदाच्या निवडणुकीत एक गट आणि दोन गण वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१७ मधील चित्र…

मागील जिल्हा परिषद निवडणुका १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पार पडल्या होत्या. काही भागांमध्ये फेरमतदान झाले होते. घाटाखालच्या तालुक्यांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले होते. त्याच बळावर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला होता. मात्र नंतर राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीमुळे जिल्हा परिषदेत सत्ताबदल झाला.गण-गट वाढीचा परिणाम कुठे?२०१७ च्या निवडणुकीवेळी खामगाव व चिखली या तालुक्यांमध्ये सर्वाधिक – प्रत्येकी ७ गट होते. बुलडाणा व मेहकर तालुक्यात प्रत्येकी ६ गट होते. यावर्षी एक नवीन गट आणि दोन गण वाढणार असल्याने कोणत्या तालुक्याला अधिक प्रतिनिधित्व मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सिंदखेडराजा तालुक्यात ५ गट आहेत.या बदलामुळे सहा प्रमुख तालुक्यांमध्ये ज्याचा गड मजबूत, सत्ता त्याच्याकडेच, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.

दोन जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार…

उदयनगर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या श्वेता महाले या महिला व बालविकास सभापती म्हणून कार्यरत होत्या. नंतर त्या चिखली विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या. या गटात आजतागायत निवडणूक झाली नाही.दुसरे उदाहरण म्हणजे देऊळगावराजा तालुक्यातील सावखेड भोई गटातून निवडून आलेले मनोज कायंदे, जे नंतर सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती.

महाविकास आघाडीमुळे समीकरणे बदलली!

२०१९ मध्ये भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले. याच दरम्यान महाविकास आघाडीची स्थापना झाली. काँग्रेसला याचा सर्वाधिक फायदा झाला. त्यांनी १४ जागा जिंकल्या.नवीन सत्तासंयोजनात अध्यक्ष काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि अर्थ व बांधकाम खाते राष्ट्रवादीकडे दिले गेले होते. मात्र काँग्रेसमध्ये जुने व निष्ठावान नेते डावलल्याने नाराजी होती.तेव्हाचे पक्षनिहाय चित्रपक्ष जागाभाजप २४काँग्रेस १४शिवसेना ९राष्ट्रवादी ८अपक्ष ३भारिप २शिवसेना पुरस्कृत काही अपक्ष सदस्य देखील होते.

39 गट व १२२ गणांवर झाली आढावा बैठक….

जिल्हा परिषदेसाठी ६१ निवडणूक विभाग व १२२ पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आढावा घेतला होता. ग्रामविकास विभागाच्या दि १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दि.१४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्याचे व त्यावर दि.२१ जुलै पर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

सत्तेचा रंग ठरणार…

या निवडणुकांमध्ये एकूणच गण-गट रचनेतील बदल, आमदार झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्यांची जागा, आणि नव्या राजकीय युती यामुळे जिल्हा परिषदेचे आगामी सत्तासमीकरण ठरवले जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, गावपातळीवरील विकासाचं राजकारण पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!