बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरकतींच्या अर्जांवरील निर्णय जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. बुलडाणा पंचायत समितीच्या कार्यालयात सकाळपासूनच अर्जदार आणि इच्छुकांची गर्दी दिसत आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा लिफ्टमधील थरार, बीडच्या रुग्णालयातील धक्कादायक अपघात!
ग्रामपंचायत निवडणूक २०२५ साठी उत्सुकता
ग्रामपंचायत निवडणूक २०२५ साठी आरक्षण प्रक्रियेतील सर्वसामान्य गटातील इच्छुकांमध्ये सध्या सर्वाधिक उत्सुकता आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव असलेली पदे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, सर्वसामान्य गटातून निवडणूक लढवण्याचा विचार करणाऱ्या इच्छुकांनी आता आपले लक्ष आरक्षण सोडतीकडे वळवले आहे.
चिखली विधानसभेत अर्ध्याहून अधिक गावांचा समावेश
बुलडाणा तालुक्यातील ८५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती चिखली विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे चिखली मतदारसंघात निवडणूक रणनीती आणि तयारीसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत समितीच्या पातळीवर मासरुळ, धाड आणि रायपूर यांसारख्या भागांमध्ये आरक्षणासाठी हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवरील निर्णयानंतर आता पुढील टप्प्यात सोडत होणार आहे.
सर्वसामान्य गटामुळे नवा पेच
यंदा अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेली पदे सर्वसामान्य गटात बदलल्यामुळे नव्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे स्थानिक राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी प्रचारपूर्व संपर्क मोहिमा सुरू केल्या असून, आरक्षण स्पष्ट होईपर्यंत थांबण्याची भूमिका काहींनी घेतली आहे.
मासरुळ, धाड आणि रायपूरकडे लक्ष
बुलडाणा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मासरुळ, धाड आणि रायपूर या भागांत आरक्षणावरून मोठा संभ्रम होता. मात्र, प्रशासनाने संबंधित हरकतींचा निकाल जाहीर केल्याने आता या भागांतही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.