साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथून जवळ असलेल्या वरुडी येथील अध्यात्मिक गुरु परमहंस तेजस्वी महाराज (श्री तेजस्वी विक्रम गुंजकर), वरुडी यांचे थोड्या वेळापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्याचं वय हे ९१ वर्षांचे होते. मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
सिंदखेड राजा तालुक्यातील ग्राम वरुडी येथे त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तांनी अध्यात्माची वाट धरली होती. त्यांच्या निधनाने मोठ्या भक्तपरिवारात शोककळा पसरली आहे.













