स्पा मध्ये काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विधवा युवतीवर ४ वर्षे लैंगिक अत्याचार…

स्पा मध्ये काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विधवा युवतीवर ४ वर्षे लैंगिक अत्याचार…

नाशिक (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): नाशिक शहरातील कॉलेज रोड येथील एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या विधवा युवतीची चार वर्षे फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

युवतीच्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती भीमसिंह नायक (रा. नवी मुंबई) यांच्या स्पा सेंटरमध्ये नोकरी करत होती. कामाच्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर भीमसिंहने तिला लग्नाचे आमिष दाखवून २२ जुलै २०२१ पासून २१ जून २०२५ पर्यंत नाशिकसह विविध ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, युवती गर्भवती झाल्यानंतर तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. लग्नाबाबत विचारणा केली असता, भीमसिंहने तिच्यावर जातीयवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी भीमसिंह नायक याच्याविरुद्ध बलात्कार, अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!