नांदुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना गाडीची धडक लागून पुरुषाचा मृत्यू

नांदुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना गाडीची धडक लागून पुरुषाचा मृत्यू

मलकापूर (रविंद्र गव्हाळे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा रेल्वे स्थानकाजवळ काल, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी रात्री ९:०५ वाजण्याच्या सुमारास एका दुर्दैवी घटनेत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका पुरुषाचा गाडीच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना रेल्वे किलोमीटर क्रमांक ५२०/२३-२५ येथे अप लाईनवर घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख टुंकी (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथील रहिवासी वेचलं तानसिंग जमरा (वय ४५) अशी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच शेगाव रेल्वे पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेकानंद राळेभात, पोलिस हवालदार डबेराव, पोलिस हवालदार खोडके, पोलिस कॉन्स्टेबल राजगुरे आणि रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) सहाय्यक उपनिरीक्षक यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर आणि त्यांचे स्वयंसेवकही ॲम्ब्युलन्ससह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह नांदुरा येथील सरकारी दवाखान्यात हलवला.

ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार, विष्णू धांडे, आनंद वावगे, वैभव राहणे आणि बाळू राऊत यांनी स्वयंसेवकांसह मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मृतदेहाची ओळख निश्चित करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ही घटना रेल्वे रुळ ओलांडताना योग्य खबरदारी न घेतल्याने घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!