मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची संतापजनक घटना घडली. दवाखान्यातून तपासणी करून घरी परतत असताना दोन युवकांनी तिचा हात पकडून “हमारे साथ चल” असे म्हणत त्रास दिला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
१६ वर्षीय मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ती दुपारी दीड वाजता आपल्या गावाकडे जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर “कहाँ जा रही हो, हमारे साथ चल” असे म्हणून तिचा हात पकडत छेडछाड केली. मात्र मुलीने आरडाओरडा करताच शेजारच्या शेतातील शेतकरी मदतीला धावून आले. हे पाहून आरोपी दोघेही पसार झाले.
महिलांना घरबसल्या उद्योगासाठी 35% अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत समीर खान जमील खान आणि शहेजाद खान (दोघे रा. मोताळा) यांच्यावर अप.क्र. ३७८/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर कलम ७४, ३ (५) बीएनएस तसेच सहकलम ८, १२ पोस्को कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.