Advertisement Advertisement

18 वर्षीय तरुणी घरा मध्ये कोणाला न सांगता निघुन गेली…!

खामगाव ( बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील १८ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांनी तत्काळ घर परिसरात, तसेच सकाळी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्रती कुठेही आढळली नाही. कोणालाही न सांगता ती घराबाहेर गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ किरण राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना तरूणी विषयी कोणतीही माहिती मिळाल्यास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!