मेरा खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न

मेरा खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न

मेरा खुर्द (अंकुश पाटील- बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील मेरा खुर्द गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गावकऱ्यांच्या शासकीय योजनांशी निगडित सर्व अडचणी एकाच ठिकाणी सोडवण्यात यश आले. यामुळे स्थानिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत झाली.

या शिबिरात ग्रामस्थांनी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, पीक विमा, किसान कार्ड, पीएम किसान योजना, राशन कार्ड यासह इतर विभागांशी संबंधित तक्रारी व अडचणी नोंदवल्या. विशेष म्हणजे, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश तातडीने देण्यात आले. यामुळे अनेक गरजूंना त्वरित लाभ मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वीर यांनी अतिशय समर्थपणे केले. यावेळी नायब तहसीलदार कडू साहेब, मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार, भरोसा गावचे सरपंच गजानन थुटे, मेरा खुर्द व भरोसा (भाग १ आणि २) येथील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच, तलाठी मगर मॅडम, सुरुशे मॅडम, मेरा खुर्दचे तलाठी शेख, कृषी सहाय्यक सवडतकर मॅडम, कोतवाल नंदू थुटटे, गावडे साहेब, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तरमळे, अभिमन्यू अवचार, चांद शेख आणि विविध विभागांचे कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!