बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास घडला…! अवघ्या २२ व्या वर्षी मातृतीर्थ सिंदखेड राजाचा नगराध्यक्ष..; मोठ्या नेत्यांनाही दाखवली जागा…

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी आणि बुलडाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी ऐतिहासिक घटना सिंदखेड राजा नगरीत घडली आहे. अवघ्या बावीस वर्षांचा तरुण थेट नगराध्यक्ष बनला असून, तोही साधासुधा नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा नगराध्यक्ष ठरला आहे.

मातृतीर्थ माँ जिजाऊ साहेबांच्या पवित्र भूमीत, सिंदखेड राजा नगरपालिकेच्या निवडणुकीत या तरुणाने राजकीय पंडितांचे अंदाज फोल ठरवत मोठा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, राज्याचे आजी-माजी मंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेत्यांनी विरोधात सभा घेतल्या, टीका केली, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही हा बाँड तरुण ढळला नाही.

या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे नेतृत्वखाली आणि जनतेचा विश्वास या जोरावर त्याने विरोधकांना पराभूत करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले.

निवडणूक काळात या तरुणावर अनेक टीका झाल्या, वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले; पण मतदारांनी थेट निकालातून उत्तर दिलं. “वय नाही तर काम महत्त्वाचं” हेच या विजयाने दाखवून दिलं आहे. गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, तरुणाईमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

सिंदखेड राजा नगरीत फटाके, जल्लोष, गुलाल आणि घोषणांनी वातावरण भारावून गेलं. ‘आमचा पोरगा नगराध्यक्ष झाला’ अशा भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होत्या.
हा विजय केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विजय आहे. येत्या काळात हा तरुण नगराध्यक्ष सिंदखेड राजा शहराच्या विकासासाठी काय नवे निर्णय घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!