देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील मनोहर जनरल स्टोअरमध्ये सोमवारी (१० जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चार जणांनी घुसून दुकानदारावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे.
फिर्यादी मनोहर शेषराव चित्ते हे त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असताना, शुभम गजानन शिंगणे, गजानन वसंता शिंगणे, शंकर वसंता शिंगणे आणि करुणा गजानन शिंगणे या चौघांनी अचानक दुकानात येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला.
हल्ल्यादरम्यान शुभम शिंगणे याने “याला जिवंत सोडायचं नाही,” असे म्हणत मारहाण केली. करुणा शिंगणे हिने लाकडी दांड्याने तर उर्वरित तिघांनी हाताने मारहाण करत दुकानातील वस्तूंची तोडफोड केली.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक सतीश नागरे करत आहेत.











