मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी दिपक कळंगे; संस्थापकअध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी केली नियुक्ती…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) धनगर समाजाच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या सकल धनगर मल्हार सेनेच्या चिखली तालुकाध्यक्षपदी दिपक गजानन कळंगे यांनी नियुक्ती करण्यात आली. सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीचे पत्र सुपूर्द करून या महत्वाच्या पदाची त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली सकल धनगर मल्हार सेना ही संघटना समाजाला राजकीयदृष्ट्या सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात सक्रीय आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असून राज्यभर विविध ठिकाणी संघटनात्मक बांधणीचे कार्य सुरू आहे. दिपक कळंगे हे गेल्या काही वर्षांपासून समाजकार्य, युवकांचे प्रबोधन आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. त्यांचा समाजातील सक्रिय सहभाग

नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्य लक्षात घेउन त्यांची तालुकाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यातील धनगर समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी या निवडीबद्दल त्यांना शुभेच्या दिल्या त्यांच्या पुढील कार्याला सर्व स्तरातून पाठींबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे…

न्याय पोहचविण्यासाठी तप्पर
धनगर समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणे ही माझ्यासाठी केवळ जबाबदारी नाही तर एक अभिमानाची गोष्ट आहे समाजातीला प्रत्येक घटकाप्रर्यन्त न्याय पोहचविण्यासाठी सदैव तप्पर राहील…


दिपक गजनान कळंगे
नवनियुत्य तालुका अध्यक्ष

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!