छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली आहे. पतीकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध, अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न, मारहाण आणि जीवाला धोका असल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारकर्त्या महिलेचं नाव रोहिणी (वय ३६, नाव बदललेले आहे) असून, ती सध्या वाळूज सिडको महानगरात माहेरी राहत आहे. तिचे पती सुशांत (वय ३८, नाव बदललेले, रा. ऐरोली, मुंबई) हे देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांचे लग्न २३ डिसेंबर २०१२ रोजी झाले होते. सुरुवातीची काही वर्षं सर्व काही सुरळीत होते, मात्र २०१५ नंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला.
मावस बहिणीशी पतीचे जास्तीचे सख्य
रोहिणी गरोदर असताना काही महिन्यांसाठी माहेरी राहात असताना तिच्या मावस बहिणी मोनालीशी सुशांतचे वाढते सख्य रोहिणीला जाणवले. मात्र तिने तेव्हा दुर्लक्ष केले. पुढे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर सुशांतच्या वागण्यात बदल दिसून आला. तो फोनवर गुपचूप बोलणे, बाहेर रात्रभर थांबणे, फोनला लॉक ठेवणे असे प्रकार करू लागला. जेव्हा रोहिणीने त्याला याविषयी विचारले तेव्हा त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
शारीरिक आणि मानसिक छळ
तक्रारीनुसार, सुशांत हा “मोनाली मला सुख देते, तूही तसेच वाग” असे म्हणत जबरदस्तीने आणि अनैसर्गिक संबंध ठेवत होता. यामुळे रोहिणीला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. तिने पतीच्या वागणुकीबाबत सासूला सांगितले पण काही फरक पडला नाही.पिरियड्समुळे नकार दिल्यावर मारहाण५ फेब्रुवारी २०२५ रोजी रोहिणी माहेरी असताना सुशांत तिथे येऊन तिच्या घरच्यांनाही दमदाटी करू लागला. त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली
. पिरियड्समुळे शारीरिक संबंधास नकार
दिल्यानंतर त्याने डोकं, डोळा, गाल व पाठीवर जबर मारहाण केली आणि गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. रोहिणीने कसाबसा बचाव करत सुटका करून घेतली.सोने-तारण कागदपत्रे पतीकडेचरोहिणीने तक्रारीत नमूद केलं की, इंडियन ओव्हरसीज बँकेत असलेल्या लॉकरमध्ये तिचं ४० तोळे सोने व महत्त्वाचे कागद आहेत. त्याची चावी मात्र पतीकडेच आहे. त्याने ती चावी देण्यास नकार दिला आहे. शिवाय तिच्या मोबाईल, सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवत आहे
. तिच्या इंस्टाग्राम व फेसबुक खात्यात लॉगिन करण्याचा प्रयत्नही त्याने केला होता.पोलिसांकडून तपास सुरूया तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सुशांतविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.