डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगावजवळील लोणी गवळी गावात २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
मृत तरुणाचे नाव रवी श्रीकृष्ण मस्तकवार (रा. लोणी गवळी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवीने भाड्याने घेतलेल्या घरातील लोखंडी जिन्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.















