लोणार (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज, २२ जुलै २०२५ रोजी पहाटे ३ वाजेपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. ढगफुटीसदृश या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने लोणार तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
Satbara Utara: सातबारा उताऱ्यातील चुका घरी बसून दुरुस्त करा, जाणून घ्या सोपी पद्धत!
जुलै २०२५ च्या सुरुवातीला मेहकर आणि लोणार तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांच्या पेरण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. शेतकरी अजूनही त्या नुकसानातून सावरले नव्हते, तोच आज पहाटे पुन्हा एकदा जोरदार पावसाने शेतीला फटका बसला आहे. देऊळगाव कुंडपाळ आणि टिटवी येथील सांडवे ओसंडून वाहत असून, काही ठिकाणी सांडवे फुटल्याने गावांमध्ये पाणी शिरले आहे. लोणार शहरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हीरडव, बोरखेडी आणि गुंधा या भागांतील शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
TVS XL100 चा नवा धमाका! 80 KM/L माइलेजसह कमी किंमतीत शक्तिशाली आणि सर्वात स्वस्त गाडी
या पावसामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरणी केली होती, पण सततच्या अतिवृष्टीमुळे त्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
हवामान खात्याने येत्या काही तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोणार आणि मेहकर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोणार तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, मदत कार्याला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.













