अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले अन् तीन महिन्यानंतर….

अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले अन् तीन महिन्यानंतर….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडली असून, बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

ही घटना लोणार तालुक्यातील एका गावातील आहे. या कुटुंबाने ३० एप्रिल २०२५ रोजी जाफ्राबाद येथील एका संस्थान परिसरात आपल्या मुलाचा विवाह केला होता. मात्र, नंतर काही संशयास्पद बाबी लक्षात आल्यानंतर ही माहिती बालविवाह प्रतिबंध अधिकारी किशोरकुमार देवकर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.

या प्रकरणाची चौकशी केली असता विवाहातली वधू ही कायद्यानुसार आवश्यक वयापेक्षा लहान असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवरा, त्याचे वडील आणि मुलीचे पालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, लोणार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे….

Join WhatsApp

Join Now

1 thought on “अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले अन् तीन महिन्यानंतर….”

Leave a Comment

WhatsApp Join Group!