ती आणि मामाची मुलगी गावातील राऊत यांच्या शेतात …..गेली; शेजारी राहणाऱ्या निवृत्तीने….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) लोणार तालुक्यातील टिटवी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.

नंदा संतोष भिसे यांनी या संदर्भात फिर्याद दिली. त्या आणि त्यांचे पती दि. २९ मे रोजी नातेवाईकांकडे चाकोली येथे नवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांच्या मुलीने सांगितले की, ती. आणि मामाची मुलगी गावातील प्रकाश राऊत यांच्या शेतात शौचास गेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या निवृत्ती लाखाडे व रामप्रसाद डवरे यांच्या मांगवाडी (ता. रिसोड) येथील नातेवाइकाने तिचा हात पकडून विनयभंग केला.

यावेळी तिने व मामाच्या मुलीने आरडाओरडा केला असता त्याने तिचा गळा आवळला आणि कोणाला सांगितल्या जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर तो निघून गेला, त्यानंतर त्याचे नातेवाईक रामप्रसाद डवरे, निवृत्ती लाखाडे व लक्ष्मण किसन डवरे यांनी ‘आमच्या मुलावर चुकीचे आरोप केल्यास जीवे मारून टाकू’ असे म्हणून मुलीला लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!