शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाचे आमिष दाखवून एका ३६ वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी खापरवाडी (ता. अकोट) येथील अमोल बाळकृष्ण आवारे या तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इथून ताबडतोब मिळवा वैयक्तिक कर्ज, व्याजदर ११.२५% पासून, इथे करा अर्ज?
युवतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अमोल आवारे याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला शेगाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नेऊन पाच ते सहा वेळा शारीरिक अत्याचार केले. मात्र, नंतर लग्नास नकार देत टाळाटाळ सुरू केली.
या तक्रारीच्या आधारे शेगाव शहर पोलिसांनी अमोल आवारे याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनी गजानन सोनटक्के करीत आहेत.