धक्कादायक..! अल्पवयीन मुलीचे अपहरण : शिवशंकर कॉलनीतील घटना, पोलिसांत तक्रार दाखल!

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): शहरातील शिवशंकर कॉलनीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना रविवारी (११ मे) उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.तक्रारदार हे खासगी कंपनीत नोकरी करत असून, ते पत्नी आणि मुलीसोबत शिवशंकर कॉलनीत राहतात.

त्यांची मुलगी दहावीच्या शिक्षणासाठी अकोला येथील आत्याकडे राहत होती. मात्र, ती १५ दिवसांपूर्वी घरी आली होती.शनिवारी (१० मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास ती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. जाताना तिने निळा टॉप व बदामी रंगाची लेगिन्स घातली होती. तिने सोबत कपड्याच्या दोन बॅग्स आणि काही कागदपत्रेही घेतली.

नातेवाईक, मैत्रिणी आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. पित्याने तक्रारीत म्हटले आहे की, कोणीतरी फूस लावून तिचे अपहरण केले असावे.जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अंमलदार जावेद पठाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “धक्कादायक..! अल्पवयीन मुलीचे अपहरण : शिवशंकर कॉलनीतील घटना, पोलिसांत तक्रार दाखल!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!