देव तारी त्याला कोण मारी! विद्युत पोलवर काम करत होता;अचानक फिट आला अन् ‘ते’ तिघे देवासारखे धावून आले…खामगाव शहरातील घटना..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव शहरातील नगर पालिकेजवळ ५ जुलै रोजी वीज दुरुस्तीचं काम सुरू असताना एक कामगार विद्युत पोलवर चढलेला असताना अचानक फिट आल्याची घटना घडली. सुदैवाने, त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच सावरले आणि मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळी विद्युत तार ओढण्याचं काम सुरू होतं. यासाठी तीन कामगार विद्युत पोलवर चढले होते. काम सुरु असतानाच त्यापैकी एकाला अचानक फिट आली. हे लक्षात येताच इतर दोन सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ पकडून दोराच्या सहाय्याने सुरक्षितपणे खाली उतरवले.घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र या व्हिडीओबाबत अनेक अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. कुठे ‘४ जण पोलवर चिटकले’ तर कुठे ‘५ जणांना विजेचा धक्का बसला’ अशा प्रकारचे मेसेज पसरू लागले. प्रत्यक्षात असे काहीही घडले नसून केवळ एका कामगाराला फिट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक जीव वाचल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!