चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील चिखली ते मेहकर रस्त्यावर आज, मंगळवार ४ जून रोजी दुपारी तीन ते साडे तीन वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. खैरव फाटा आणि मुंगसारी फाटा दरम्यान झालेल्या या अपघातात एक महिला व एक लहान मुलगा जागीच ठार झाले असून, इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, MH04 GE 5508 या क्रमांकाची चारचाकी कार आणि एक प्लॅटिना मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की मोटारसायकलवरील महिला व मुलगा जागीच ठार झाले. घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.
धक्कादायक! चुलत काकाने अल्पवयीन पुतणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवले; धाड पोलिसांची त्वरित कारवाई
अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतर नागरिकांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले याची माहिती मिळाली आहे!. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वाहनाचा अतिवेग किंवा चुकीचा ओव्हरटेक हे प्राथमिक कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे! या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
1 thought on “भीषण अपघात! चिखली-मेहकर रोडवर खैरव फाटा जवळ चारचाकी आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक; महिला आणि मुलाचा जागीच मृत्यू!”