Karj Mafi Yojana News: बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार! कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ५ मे रोजी सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा

Karj Mafi Yojana News: बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार! कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ५ मे रोजी सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा

सिंदखेडराजा (राहुल साबळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यातील हजारो शेतकरी आता एकत्र येत आपली हक्काची मागणी सरकारसमोर मांडण्याच्या तयारीत आहेत. मागील कर्जमाफी आणि पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ५ मे रोजी सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शेतकरी योद्धा कृती समिती आणि किसान ब्रिगेडच्या वतीने आयोजित केला आहे.

शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली ‘मागेल त्याला, गरज त्यालाच कर्जमुक्ती’ या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांकडून कर्जमाफी अर्ज भरून घेण्याची मोहीम सध्या संपूर्ण जिल्ह्यात राबवली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत पळसखेड चक्का, गोदंनखेड, पिंपळगाव लेंडी, किंनगाव राजा, सिंधी, बाळ समुद्र आणि सिंदखेडराजा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरले आहेत.

Pik Vima Yojana: सुधारित पीकविमा योजनेला मंजुरी, आता केवळ पीक कापणी प्रयोगावरच भरपाई मिळणार

राज्य सरकारने नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आज सहा महिने उलटले तरीही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याउलट काही नेत्यांनी शेतकऱ्यांनी स्वतःचे कर्ज फेडावे, असे वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकनायक शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी पुन्हा एकदा जनआंदोलनाची हाक दिली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलीपभाऊ चौधरी, बालाजी सोसे आणि गजानन जायभाये या शेतकरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कर्जमुक्ती अर्ज भरण्याची सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सर्व अर्ज १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहेत.

Women Empowerment Buldhana: शेतातून उद्योजकतेकडे, वंदना ताई टेकाळे यांची प्रेरणादायी कहाणी

त्याचबरोबर, २०२३ रब्बी व खरीप तसेच २०२४ च्या खरीप हंगामात पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या किंवा अल्प विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्याही मागण्यांचा मुद्दा या मोर्च्यात मांडला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन अधिक व्यापक बनले आहे.

शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “Karj Mafi Yojana News: बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार! कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ५ मे रोजी सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा”

Leave a Comment

WhatsApp Join Group!