जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी;युवतीची बदनामी करण्याचा प्रयत्न….

शेगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज)सोशल मीडियावर दीड वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या खासगी व्हिडिओंचा गैरवापर करून एका युवतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाची मुलगी स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवर सोशल मीडियाचा वापर करत होती. याच दरम्यान तिने दीड वर्षांपूर्वी स्नॅपचॅट अॅपवर काही वैयक्तिक व्हिडिओ अपलोड केले होते. सदर व्हिडिओ आरोपीने मिळवून ते युवतीच्या नातेवाइकांना पाठवत तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीने फिर्यादीशी अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पीडित कुटुंब मानसिक तणावात आले असून त्यांनी शेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली.

त्यावरून शेगाव पोलिस ठाण्यात अमन पहलाजरा नागदेव (रा. सरस्वतीनगर, शेगाव) याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!