खैरव (बुलडाणा कव्हरेज न्युज) जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना खैरव येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १६ जून रोजी घडली. कल्पना बारीकराव लहाने (वय ५१, रा. खैरव) यांच्यात आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. त्या दिवशी पुन्हा वाद उफाळून आला. वाद मिटवण्यासाठी कल्पना लहाने यांचा मुलगा प्रदीप लहाने पुढे आला असता, आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड मारला आणि त्याला गंभीर जखमी केलं.
या प्रकरणी कल्पना लहाने यांनी अंढेरा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सिंधू पुंजाराम लहाने, प्रवीण पुंजाराम लहाने, आम्रपाली भीमराव साळवे आणि संध्या विलास झोटे (सर्व रा. खैरव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…