जि.प. शाळा रोहडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उंटावरून मिरवणूक करत उत्साहात स्वागत!

रोहडा (राहुल टाकळकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, रोहडा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची खास उंटावरून मिरवणूक काढण्यात आली.

शाळेच्या प्रवेशद्वारी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना कुमकुम तिलक लावण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिल्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक नवोदित विद्यार्थ्याच्या पहिल्या पावलांचे ठसे घेण्यात आले, हे या उपक्रमाचे खास आकर्षण ठरले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संजय बुरकूल, माजी सरपंच श्री. नारायण अप्पा चित्राळे, शिवसेना नेते श्री. दीपक कळंगे, श्री. नंदकिशोर तायडे, माजी अध्यक्ष श्री. सुदाम पंडित, पो. पाटील श्री. सुनील बुरकूल, श्री. निलेश भुसारी, अनिल खरात, ओम खरात, आकाश जाधव, अरुण खरात, ज्ञानेश्वर जाधव, नितीन शिंगणे, तसेच समिती सदस्या सौ. पार्वती लव्हाळे व सौ. ज्योती खरात यांची उपस्थिती लाभली. गावातील बहुसंख्य पालकही या सोहळ्यास साक्षी होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाहेकर सर, श्री. गाभणे सर, श्री. खान सर, श्री. जवंजाळ सर, श्री. कुजटवाड सर तसेच कु. वर्षा सोळंकी मॅडम व कु. रंजणी खूपसे मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!