जेसीबीने एका आजोबाला उडवले त्यांचा जागीच मृत्यू; चालका विरोधात गुन्हा दाखल!

देऊळगाव राजा (गणेश मुंढे:-बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील जुमडा गावात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे चालवलेल्या जेसीबी मशीनच्या धडकेत हे वृद्ध मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून, आता जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २२ मे रोजी घडली. नितीन जनार्धन मुख्यदल (वय ३२, रा. जुमडा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा अपघाती नसून जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे.

अपघातानंतर प्रथम पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, अंत्यविधीनंतर गावात झालेल्या चर्चांनंतर नितीन मुख्यदल यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, चालकाने काळजीपूर्वक वाहन चालवले असते, तर त्यांचे वडील वाचले असते.

तक्रारीच्या आधारे आता पोलीसांनी जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बद्रीनाथ डिघोळे करत आहेत.

हा प्रकार समोर आल्यानंतर जुमडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्धाचा मृत्यू होणे ही एक मोठी शोकांतिका आहे. तसेच, निष्काळजीपणामुळे घडणारे अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!