दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जऊळका गावात २८ ऑगस्ट रोजी दुपारी विजेचा धक्का बसून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. मंगलबाई रंगनाथ सांगळे (वय ५७) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार, मंगलबाई पती रंगनाथ सांगळे यांच्यासोबत सकाळी शेतात सोयाबीन निंदणीसाठी गेल्या होत्या. शेतात उभारलेल्या विद्युत खांबाला आधार देण्यासाठी बसवलेल्या स्टे-तारेस हात लागल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्या वेळी पावसामुळे जमीन ओली असल्याने शॉकचा परिणाम अधिक झाला आणि मंगलबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, सांगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.